जिल्ह्यात जोर पकडला; अध्यक्षासाठी ४ तर सदस्यासाठी ६१ नामांकन दाखल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
local-government-elections : नगर पालिका निवडणुकीकरिता आज १५ रोजी नामांकन दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेत अध्यक्षपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी ६१ नामांकनपत्र दाखल झाले.
 
 
jklk
 
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे या सहा नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी आज शनिवार १५ रोजी वर्धा नगर परिषदेत सदस्यासाठी २० नामांकनपत्र, हिंगणघाट नगर परिषदेत सदस्यपदासाठी १८, आर्वी येथे सदस्यपदासाठी ८, देवळी येथे सदस्य पदासाठी २, पुलगाव येथे सदस्य पदासाठी १३ नामांकनपत्र दाखल झाले. तसेच हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व वर्धा नगर परिषद अध्यक्षपदासाठी प्रत्येकी १ असे ४ नामांकनपत्र दाखल झाले आहे, असे नगर पालिका प्रशासनाने कळविले आहे.