तभा वृत्तसेवा पुसद,
Pusad State Bank दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पेन्शनधारक बँकांमध्ये गर्दी करत आहेत. पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र ज्या बँकेतून त्यांना पेन्शन मिळते त्या बँकेत सादर केले जाते. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शनधारकांची पेन्शन बंद होते.
पुसद येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला कोषागार आणि इतर विभागांकडून सुमारे 3 हजार 500 पेन्शनधारकांकडून पेन्शन मिळते, त्यामुळे स्टेट बँकेत पेन्शनधारकांची गर्दी असते. बँकेचे प्रशासक परमेश्वर पांचाळ यांनी यावर्षी जीवन प्रमाणपत्रासाठी बँकेत येणाèया पेन्शनधारकांसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, बँक बसण्याची व्यवस्था, चहा, पाणी आणि नाश्ता उपलब्ध आहे.
टोकन सिस्टीमद्वारे, पेन्शनधारकांचे आधारकार्ड, बँक पासबुक आणि पॅनकार्ड पडताळले जातात आणि जीवन प्रमाणपत्रांवर सर्वांच्या स्वाक्षèया घेतल्या जातात. यावर्षी पेन्शनधारकांनी बँक प्रशासक परमेश्वर पांचाळ यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले. बँकेत येऊ न शकणाèया वृद्ध आणि असहाय्य पेन्शनधारकांच्या घरी जीवन प्रमाणपत्रे पोहोचवण्याची व्यवस्था बँकेने केली आहे.