मुंबई,
rajkumar rao baby boy बॉलिवूडमध्ये सकाळी सकाळी आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आई बाबा झाले आहेत. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असून दोघेही अत्यंत आनंदात आहेत.
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना लग्नाच्या चार वर्षांनी मुलगी झाली आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका गोंडस मुलीचे वरदान दिले आहे, असे म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली. राजकुमार रावने पोस्टमध्ये लिहिले, "आमच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाने दिलेला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे." राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न केले. ते दोघेही ११ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांचे लग्न चंदीगडमध्ये शाही थाटात पार पडले होते. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची पहिली भेट २०१० साली झाली, तर २०१४ साली आलेल्या सिटीलाइट्स या सिनेमात ते एकत्र दिसले होते.