श्री राजेंद्र हायस्कूलच्या सहेरीश शेखला सुवर्णपदक

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Rajendra High School श्री राजेंद्र हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थिनी सहेरिश शेखने ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकले. तेलंगाणातील करीमनगर येथे आयोजित सब-जूनियर फेमेल ओपन कुमाइट कराटे चॅम्पियनशिपमध्ये नवव्या वर्गातील या विद्यार्थिनीने प्रथम स्थान मिळवून सुवर्णपदक, बारा हजार रुपयांचा रोख पुरस्कार, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्राप्त केले.
 
 
nagpur
 
तिच्या या यशाबद्दल दि.एम.पी. एज्युकेशन सोसायटीचे सचिव मोहन नाहातकर, सहसचिव विवेक नाहातकर, मुख्याध्यापिका डॉ स्मिता नाहातकर, उपमुविद्यार्थ्यांनी अर्चना बोडखे, Rajendra High School पर्यवेक्षिका, वर्षा निवांत पर्यवेक्षक विलास जाधव, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले.
सौजन्य: निकिता गावंडे, संपर्क मित्र