सरस्वती विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Saraswati Vidyalaya Shankarnagar शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून झाली. त्यानंतर रुपाली बक्षी यांनी सादर केलेल्या बालदिन गीताने वातावरण आनंदमय केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत अनघा पेंडके यांनी केले. या निमित्ताने शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांसाठी छोटी, विनोदी व संदेशपर नाटिका सादर केली. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत ही नाटिका विशेष आकर्षण ठरली.

bal 
 
 
मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व समजावून सांगताना,“आजची मुले म्हणजे उद्याचा भारत. तुमच्यातील निरागसता, स्वप्ने आणि कुतूहलच या देशाचे खरे सौंदर्य आहे,Saraswati Vidyalaya Shankarnagar”असे प्रेरणादायी उद्गार काढले.कार्यक्रमाला उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक रविंद्र कुलकर्णी व राहुल घोडे यांची उपस्थिती लाभली. दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संयोजन नीटनेटकेरीत्या पार पडले. संचालन स्वप्नील तिजारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपर्णा चंदेल यांनी केले.
सौजन्य:अनघा पेंडके,संपर्क मित्र