रावळपिंडीत बाबरचा दबदबा; श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
रावळपिंडी,
Sri Lanka defeated by Pakistan पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम अखेर दोन वर्षांच्या शतकाच्या प्रतिक्षेतून मुक्त झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 102 धावा ठोकत विलक्षण पुनरागमन केले. बाबरच्या या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर 8 विकेट्सने विजय मिळवत मालिका जिंकली.
 
 
Sri Lanka defeated by Pakistan
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरांत 8 विकेट्सच्या मोबदल्यात 288 धावा उभारल्या. जनिथ लियानगे (54), कामिंदु मेंडीस (44), सदीरा समरविक्रमा (42) आणि शेवटच्या षटकांत वानिंदु हसरंगा (नाबाद 37) यांनी मध्यम-मोठ्या खेळी केल्या. पाकिस्तानकडून अब्रार अहमद आणि हरीस रौफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर फखर झमान आणि सॅम अयुब यांनी 77 धावांची भागीदारी करत पाया घातला. सॅम 33 धावांवर बाद झाला तरी फखरने सुरेख फॉर्म कायम ठेवत 78 धावांची खेळी साकारली.
 
 
यानंतर फखर आणि बाबर आझम यांनी महत्त्वाची शतकी भागीदारी करत पाकिस्तानचा विजय जवळ आणला. फखर बाद झाल्यानंतर बाबरसोबत मोहम्मद रिझवान क्रीजवर आला आणि दोघांनी सामन्याला निर्णायक वळण देणारी नाबाद 112 धावांची भागीदारी रचली. रिझवानने 51 धावा केल्या, तर बाबरने 119 चेंडूंमध्ये नाबाद 102 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानने 48.2 षटकांत फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पूर्ण करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अपराजेय आघाडी घेतली. श्रीलंकेकडून दुश्मंथा चमीरा यालाच दोन्ही विकेट्स मिळाल्या. बाबरच्या शतकासह पाकिस्तानचा हा विजय केवळ मालिकेतली आघाडी पक्की करणारा नाही, तर त्यांचा आत्मविश्वासही तब्बल वाढवणारा ठरला आहे.