भयानक अंधश्रद्धेपोटी महिले आपल्या दोन चिमुकल्यांचा बळी दिला

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
अहमदाबाद,
Two toddlers killed गुजरातमधील नवसारी येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे. अंधश्रद्धेच्या गर्तेत गेलेल्या एका महिलेने आपल्या पूर्वजांच्या ‘तारणासाठी’ दोन निरागस मुलांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ही घटना बिलीमोरा शहरातील देसरा परिसरातील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. मूळची उत्तर प्रदेशातील असलेली सुनीता शर्मा ही पती शिवकांत, दोन मुले –वय ७ आणि ४ वर्षे तसेच सासू-सासऱ्यांसोबत राहात होती. या काळात शिवकांत टायफॉइडमुळे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला जेवण देण्यासाठी सासरे इंद्रपाल आणि त्यांची पत्नी रात्री उशिरा रुग्णालयात गेले आणि परत येऊन आपल्या खोलीत झोपले.
 
Two toddlers killed
 
 
दरम्यान, सुनीता आपल्या बेडरूममध्ये होती. मध्यरात्री ती अचानक देवाकडे प्रार्थना करू लागली आणि पूर्वजांच्या ‘उद्धारासाठी’ एखादे बलिदान द्यावे लागेल, असा तिचा समज झाला. त्या अंधश्रद्धेच्या भरात तिने आपल्या दोन निष्पाप मुलांचा गळा दाबून जीव घेतला. इतकेच नव्हे तर ती सासऱ्यांना मारण्यासाठीही धावली, मात्र ते वेळेत जागे झाले आणि पळून जाऊन जीव वाचवू शकले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी सुनीताला अटक केली. नवसारी पोलिसांनी सांगितले की या प्रकरणात कोणतेही शस्त्र वापरले गेले नसून संपूर्ण घटना अंधश्रद्धेच्या नावाखाली घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.