तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vijay walde शहरात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्याकडे पाच ते सहा वर्षांपासून लाईन पेपर वितरण करणारे विजय शंकर वालदे (वय 27) या युवकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर परीश्रम घेतले. सतत सर्वच शासकीय परीक्षा देऊन त्यांची जिद्द यशस्वी झाली. नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये चतुर्थी श्रेणी कर्मचारी म्हणून त्यांची सेवेत निवड झाली.
यानिमित्त संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक शिंदे, आसिफ शेख, किरण कोरडे, श्रीराम खत्री, राजू हनवते, सचिन कदम, संतोष शिरभाते, श्रीपाद तोटे, मनीष अहीर, मोरेश्वर धुमडे, चंदू गावडे, संजय गजलवार, विजय हनवते आणि मोठ्या संख्येने वितरण करणारे सहकारी उपस्थित होते.