नप निवडणुकीतील नावं गुलदस्त्यात; धाकधूक वाढली

* संकेतांवर रंगू लागल्या गप्पा

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-municipal-council-elections : नगर पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. परंतु, स्वबळावर लढणार्‍या भारतीय जनता पार्टीसह एकत्र लढणार्‍या महाविकास आघाडीकडून नगरसेवक वा नगराध्यक्षांची नावं गुलदस्त्यात असल्याने इच्छूकांची धाकधूक वाढली आहे.
 
 
 
j
 
 
 
जिल्ह्यात ताकदीने उभ्या असलेल्या आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा भकम पाठींबा असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यातील सहाही नगर पालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या वतीने काही ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव भाजपाला देण्यात आला होता. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद देण्यात आला नाही. सक्षम असलेल्या भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यातील एकाही नगराध्यक्षाचेच नव्हे तर नगरसेवकाचेही नाव जाहीर केलेले नाही. या पक्षाकडून पक्षातील आणि पक्षाबाहेरील इच्छूकांची तिकीटासाठी प्रचंड इच्छा असल्याने तिकिटाकडे डोळे लावून बसलेल्यांनी तिकीट न मिळाल्यास महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किंवा बंडखोरी होण्याची शयता लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने आपली पत्ते उघड केले नाहीत. मात्र, ज्या प्रभागांमध्ये नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी तिढा नाही त्या प्रभागातील इच्छूकांना कामाला लागण्याचे संकेत दिल्या गेले आहेत.
 
 
जवळपास महाविकास आघाडीतही भाजपाप्रमाणेच स्थिती आहे. महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारीवरून नाराजी असल्याने त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. वर्धेत काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे नाव जवळपास फायनल झाल्याचे सांगण्यात येते. शरद पवार राकाँचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी महाविकास आघाडीत प्रमुख नेता म्हणून घेतलेल्या आघाडीने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पक्षात कोणतीही जबाबदारी नसलेले समीर देशमुख यांनी नगरसेवकांच्या जागांसाठी आग्रह धरला होता. परंतु, त्यांच्या मताला प्राधान्य दिल्या गेले नसल्याची चर्चा महाविकास आघाडीत आहे. दुसरीकडे राजेश सराफ यांच्या नेतृत्वात शिवसेनेनेही नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी निवडणूक लढण्याची तयारी केली. त्यापाठोपाठ संतोष ठाकूर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून घडाळ्याचे काटेही स्पर्धेत आणले.
 
 
तिकीट मिळत असेल तर टॅस भरण्यात अर्थ
 
 
तिकीटाच्या रांगेत असलेल्यांकडे नगर पालिकेचा मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात संघळून होता. उमेदवारी मिळत असेल तर टॅस भरण्यात काही ‘राम’ अशी भूमिका काहींनी घेतली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना टॅस भरल्याची पावती सर्वात महत्त्वाची असल्याने टॅस भरण्यासाठी इच्छूकांनी नगर पालिकेत रांग लावली आहे. यानिमित्ताने नपची कर वसुलीही होऊन जात आहे.
 
 
रविवारचा दिलासा
 
 
निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे. नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी संगणक प्रणालीत अडचण येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये सुटीच्या दिवशी म्हणजे विवारी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितील संगणकप्रणालीवर भार येण्याची शयता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून रविवारी देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे निर्देश दिल्याने रविवारचा दिलासा मिळाला आहे. आज शनिवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.