वर्धेत आठवडाभर सांस्कृतिक महोत्सव

*गौतमी पाटीलची लावणी, रोहित माने, वनिता खरात यांचा हास्यकल्लोळ *मोहीत सहारे यांची पत्रपरिषदेत माहिती

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
cultural-festival-in-wardha : जिल्ह्यातील कलावंतांना प्रोत्साहन तसेच त्यांना हकाचं व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून येत्या २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान वर्धेत पहिल्यांदाच वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणार्‍या या महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांची लावणी तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रोहित माने आणि वनिता खरात यांचा हास्यकल्लोळ वर्धेकरांना अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती मोहित शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोहित सहारे यांनी आज शनिवार १५ रोजी वर्धा वर्धन हॉट येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 j
 
मोहित सहारे पुढे म्हणाले, नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी, डी. ब्रोज, ब्लड हेल्पलाईन विदर्भ, वर्धा विभाग मोहीम, नेवारे फोटो स्टुडिओ, उत्तराताई जांभुळकर बहुउद्देशीय संस्था, यारियान्स फिल्मस, दी व्हाईस ऑफ विदर्भ यांच्या संयुत सहकार्याने वर्धा सांस्कृतिक महोत्सवाचे येथील स्वावलंबी मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, गायन, मॉडलिंग, ड्रामा, चित्रकला स्पर्धा यासह या महोत्सवात अनेक कला सादर करता येणार आहे. २० रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची उपस्थिती राहणार आहे.
 
 
रात्री ७ ते १० पर्यंत युवांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी गौतमी पाटील यांचा लावणी नृत्य, २२ रोजी डान्स, २३ रोजी रोहित माने आणि वनिता खरात यांचा हास्यकल्लोळ अनुभवयास मिळणार आहे. २४ रोजी तरुणांसाठी सिंगींग, २५ रोजी फॅशन शो तर २६ रोजी ड्रॉइंग, रांगोळी स्पर्धा होईल. यासोबतच पोलिस भरतीची स्पर्धा परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे. आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याचे सहारे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रफुल्ल कावळे, राजकुमार दरणे, प्रतिक सूर्यवंशी, अभिलोष डाहुले, श्रेयश गिरमकर, अमितकुमार लाकडे, पराग पिंपळे, अक्षय मोरे आदींची उपस्थिती होती.