नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक

नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींना मुभा

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-election : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर, आर्णी व नगरपंचायत ढाणकी यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
 
 
 
y15Nov-Namankan
 
 
 
नामनिर्देशनपत्रे संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा कालावधी आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिल्याने, संगणकप्रणालीवरील संभाव्य भार आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
 
 
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, उमेदवारांना उर्वरित दिवसांच्या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतील. ऑनलाईन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. तसेच ऑफलाईन पारंपारिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिकाèयांकडे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील याच वेळेत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील, असे कळविण्यात आले आहे.
 
 
 
भाजपा, काँग्रेसच्या नप अध्यक्ष उमेदवार ‘मैदानात’
 
 
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगर परिषद अध्यक्षपदासाठी भाजपाकडून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या कन्या अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी नामांकन दाखल केले आहे. तर काँग्रेसकडून नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी नामांकन दाखल केले आहे.
 
 
भाजपाच्या अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, शंतून शेटे, माजी नगरसेवक नितिन गिरी, रेखा कोठेकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर माधुरी मडावी यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. माधुरी मडावी यांच्या नामांकन दाखल केल्याने निवडणूकीत चांगलीच रंगत येणार आहे.