फिरत्या वाहनांवर ध्वनिक्षेपक वापरास बंदी

रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकावरून करता येणार प्रचार

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
ban-on-use-of-loudspeakers : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान आता सकाळी 6 वाजेपासून रात्री निश्चित केलेल्या वेळेपर्यंत ध्वनिक्षेपकावरुन प्रचार करता येणार आहे. सकाळी आणि रात्री नियमाने दिलेल्या वेळेत थांबूनच प्रचार करावा. फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपकाच्या वापराला सक्त मनाई आहे.
 
 
 
y16Nov-Loudspeaker
 
 
 
ध्वनी प्रदूषणाने सर्वसामान्य लोकांच्या शांततेला व स्वास्थ्याला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण निर्बंध जारी केले आहेत. निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजात प्रचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हे निर्बंध घातले आहेत.
 
 
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासन निवडणूक प्रचार व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष (वॉच) ठेवून आहे. त्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचार करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा ध्वनीप्रदूषण आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांची परवानगी अनिवार्य
 
 
ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यापूर्वी पोलीस अधिकाèयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. नियमात दिलेल्या वेळे व्यतिरिक्त कोणत्याही फिरत्या वाहनावर किंवा कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. 10 वाजेपर्यंत रात्री ध्वनिक्षेपकावरून प्रचार करता येणार आहे. दिवसा प्रचाराकरिता फिरणाèया वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा.
पोलिस विभाग दक्ष राहून प्रचारावर ठेवणार ‘वॉच’
 
 
सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि इतरांनी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेला कळवणे बंधनकारक असलल. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.