बेलोरा गावाला पूर प्रतिबंधक भिंतीमुळे मिळणार दिलासा

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
मानोरा, 
flood-protection-wall : तालुक्याची जीवन वाहिनी असलेल्या अरुणावती नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या कारखेडा या गावाला पुराचा दरवर्षी धोका पोहोचत असतो या गावाच्या सीमेला लागून असलेल्या बेलोरा या गावासह परिसराला प्रभावित करणार्‍या खोराडी नदीच्या पूर परिस्थितीला नियंत्रणात आणण्याच्या ग्रामस्थ तथा परिवर्तन शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला निधीच्या रूपात शासनाकडून मंजुरी मिळाल्याने अंशतः का होईना यश मिळाले असल्याचे पुढे येत आहे.
 
 
 
KL
 
 
 
२०२३ च्या जुलै महिन्याच्या २२ तारखेला आलेल्या खोराडी नदीच्या महापुराने बेलोरा गावातील अनेक नागरिकांचे कुटुंब उध्वस्त केले होते तथा शेतशिवाराचे सुद्धा मोठे नुकसान केले होते. बेलोरा ग्रामवासियांना खोराडी नदीच्या पुराचा दरवर्षी नुकसानेच्या रूपाने करावा लागत असलेला सामना या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारून काही प्रमाणात कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा आवाज बनवून परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने लढा उभारण्यात आला होता ज्यामुळे तालुका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला या समस्येची दखल घ्यावी लागली व शासनाकडे पाठपुरावा करावा लागल्याने या क्षेत्राच्या संरक्षणासाठी शासनाकडून तब्बल २ कोटी ११ लाख रुपयाची राशी मंजूर करण्यात आली असून आता येथे संरक्षण भिंतीची निर्मिती सुद्धा सुरू झालेली आहे.
 
 
खोरडी नदीच्या प्रलयाचा सामना कारखेडा ह्या गावातील अनेक शेतकर्‍यांना दरवर्षी नुकसानीच्या रूपात सहन करावा लागत असून ही समस्या प्रलंबित असल्याने परिवर्तन शेतकरी संघटनेच्या लढ्याला पूर्ण यश मिळाले नसून बेलोरा वाशी नागरिकांनी परिवर्तन शेतकरी संघटनेला सोबत घेऊन आपली मागणी पूर्ण केली असल्याने परिवर्तन शेतकरी संघटनेला तूर्तास अंशतः यश मिळाल्याचे व कारखेड्याची समस्या मार्गी लागल्यावर हे यश शतप्रतिशत पूर्ण होईल, असे सुद्धा मंजूर झालेल्या राशीवरून व सुरू झालेल्या कामावरून बोलले जात आहे.