बिरसा मुंडा जयंती जनता विद्यालयात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
birsa-munda-jayanti : जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे महान क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक सुधारक आणि आदिवासी हक्कांचे पुरस्कर्ते धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती विविध उपक्रमांनी दि. १५ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली.
 
 
 
j
 
 
 
जल, जंगल, जमीन या आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देणार्‍या या अमर वीराला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण शाळा एकत्र आली होती. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे पर्यवेक्षक संजय पिवटे कार्यकमाच्या अध्यक्षा सोनम मुकलवार तर प्रमुख वक्त्या रिया देशमुख यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
 
 
उपस्थितांनी दोन मिनिटे शांत राहून आदरांजली वाहिली. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीताने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर आधारित, भाषण घोषवाय प्रस्तुती अशा विविध उपक्रमांची मनमोहक सादरीकरणे केली. धरती आबा बिरसा या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स आणि कोलाज प्रदर्शनाचे सर्वांनी कौतुक केले.
 
 
शालेय प्रांगणात आदिवासी संस्कृती आपली शान आणि बिरसा मुंडा — निसर्गाचे रक्षक अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. शिक्षकांनी पर्यावरण संवर्धन, निसर्गप्रेम, समानता भावना आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बैरागी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनन्या पाटील यांनी केले.