ऐतिहासिक! चीनच्या पर्वतांमध्ये १ हजार टन सोन्याचा खजिना उजेडात

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
चीन,
China gold discovery पृथ्वीच्या भूगर्भात अजूनही अनेक अद्भुत खजिने दडलेले आहेत, ज्याचा शोध मानवाला लागलेला नाही. त्यातच एक चमत्कार सध्या समोर आला आहे. चीनमधील शिनजियांग उइगर भागातील कुनकुल पर्वतांमध्ये वैज्ञानिकांना तब्बल १ हजार टन सोन्याचे भांडार सापडले आहे. हा शोध आतापर्यंतचा सर्वात मोठा सोन्याचा साठा मानला जात आहे आणि त्याची किंमत अब्जो रुपये आहे.
 

China gold discovery 
चीनच्या भूवैज्ञानिक दलाचे वरिष्ठ अभियंता फुबाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभर प्रयत्न करून हा भांडार शोधून काढला आहे. हा शोध सायन्स मॅगझिन अॅक्टा जिओसाइंटिका सिनिका मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कुणकुल पर्वतांमध्ये सापडलेले हे सोन्याचे भांडार चीनमधील तिसरे सर्वात मोठे असून, त्याआधी लियाओनिंग प्रांत आणि हुनान प्रांतातही मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे आढळलेले आहेत.वैज्ञानिकांसाठी या शोधाचे महत्त्व केवळ आर्थिक दृष्ट्या नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही आहे. पुराणकथांमध्ये कुणकुल पर्वताला पवित्र, दिव्य आणि भव्य स्थान म्हणून वर्णन केलेले आहे. प्राचीन ग्रंथ द क्लासिक ऑफ माऊंटेंस अँड सीज मध्ये या पर्वताला पृथ्वीचे केंद्र मानले गेले असून, पृथ्वीवरील सर्व खनिजसंपत्ती या ठिकाणी असल्याचे नमूद केले आहे. पुराणकथांमध्ये या पर्वताची तुलना ग्रीक पौराणिक कथेत वर्णन केलेल्या माऊंट ओलिंपसशी केली गेली आहे.
 
सोन्याचे हे भांडार आढळणे फक्त भूवैज्ञानिक दृष्ट्या नव्हे तर पुरातन कथानकांशी सुसंगत असल्यामुळे जगभरातील संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विज्ञान आणि पुराणकथांचा संगम या शोधामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे की पृथ्वीच्या पोटात अद्याप अनेक अनोख्या गोष्टी दडलेल्या आहेत.