छत्रपती चौकात विद्यार्थ्यांची पर्यावरण व वाहतूक जनजागृती

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Chhatrapati Chowk सोमलवाडा भाग पर्यावरण संरक्षण गतीविधी अंतर्गत छत्रपती चौक येथे पांडे लेआउट येथील तपोवन माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यां सोबत चौकातील वाहन धारकांना पर्यावरण विषयी तसेच वाहतुकीच्या नियमाचे साईन बोर्ड मार्फत जागरूक करण्याकरिता प्रबोधन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील १६ विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी तसेच शाळेतील अंकित वाडीचर उपस्थित होते.
 
Chhatrapati Chowk
पर्यावरण गतीविधीतर्फे नरेश हिवरखेडकर, शंकर साठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुलांना ट्रॅफिक पोलीस भास्कर पांडे यांनी ट्रॅफिक नियम व नागरिकांचे कर्तव्य काय आहे या विषयी विविध प्रकारची मुलांना माहिती दिली तसेच वाहतुकीच्या नियमाचे मार्गदर्शन केले. Chhatrapati Chowk कार्यक्रमा नंतर सर्व मुलांना चॉकलेट देऊन त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रम अतिशय मार्गदर्शक व शिस्तबद्ध पार पडला. शाळेतील मुलांनी अति उत्साहाने कार्यक्रमात भाग घेऊन लोकांना पर्यावरण विषयी प्रबोधन केले.
सौजन्य: सुधांशु दाणी, संपर्क मित्र