तभा वृत्तसेवा
Kalamb illegal sand mining कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू असून शासकीय सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात रेतीचा व मुरमाचा अवैध उपसा होत आहे. ओव्हरलोड वाहतूक करून रेती तस्कर स्थानिक रस्त्यांची वाट लावून स्वत:ला ‘समृद्धी’कडे नेणारा महामार्ग प्रशस्त करीत आहेत.सातेफळ येथून ग्रामसेवक व तलाठ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये आहे. या रेती तस्करांमध्ये कळंब तालुक्यातील एक ढाबाचालक, शहरातील एक राजकीय पुढारी व शिरपूर येथील एक माफिया असल्याची चर्चा परिसरात आहे. या तिघांनी मिळून तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा सुरू केला आहे.
सातेफळ इथून मोठ्या प्रमाणामध्ये दहा ते बारा ट्रॅक्टर चालत असताना स्थानिक पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या अवैद्य रेती उपसातून ढाबामालक व शिरपूर येथील एक माफिया समृद्ध होतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या अवैद्य रेती तस्करांच्या मुसक्या कोण आवळणार, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या रेती तस्करांमुळे शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोळीयुद्ध भडकले आहे. येणाèया काळामध्ये कळंब शहर व तालुक्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये. त्यामुळे या रेती तस्करांवर लगाम लावण्याची जबाबदारी कोण स्विकारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.