तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
kalasangam-competition : नागपूर येथे श्रीकृष्ण कल्चरल संस्थेद्वारे आयोजित ऑल इंडिया डान्स, म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंटल स्पर्धा तसेच फेस्टिव्हल कृष्णमायोखम् 2025 अंतर्गत झालेल्या सहावी कलासंगम स्पर्धेत यवतमाळच्या जाजू इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत सर्वाधिक बक्षिसे पटकावत भव्य यश संपादन केले.

सब-ज्युनियर गटात अवनीश प्रमोद पांडे, प्राजक्ता अरुण कुडमते, श्रीमयी देशमुख, पौरवी राऊत, नफीस मुनताहा सय्यद मुजाहीद, आर्ची लालवाणी व तितीक्षा यादव यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला प्रोत्साहन पारितोषिक प्राप्त झाले. ज्युनियर गटात सकीना अली बॉम्बेवाला, अनाया जाजू, खुशी राठी, अनन्या गवळी, मिथिलेश आडे, गायत्री अत्राम व श्रेया पोपट यांनी देशभक्तीपर गीत सादर करून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. याच गटातील मिश्री राडिया, प्रेम देहनकर, आराध्या कटारिया, ओजस्वी देशमुख, साची काबरा व क्रिष्णा व्यास यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच रिद्धी अग्रवाल, रीत जाजू, विश्वजा चौधरी, तनिष्का रहाटे, स्वरा विंचूरकर, आस्था जयस्वाल व रागिणी रावते यांनी लोकनृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
समूह तबला वादन स्पर्धेत अनय भगत, भूषण रिंगणे, अरजीत देशमुख, विराज नागरगोजे, आरुष केशोवार, कलश भिवगडे, स्वस्तिक ढबाले, कौतुक खडसे, वेद तेलेवार, रिदांत खारकर व सोहम सरोदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत शाळेचा मान वाढवला. एकल गायनात अनन्या गवळी व ओजस्वी देशमुख हिला प्रोत्साहन पारितोषिक मिळाले तर गायत्री अत्राम हिने आपल्या सुरेल सादरीकरणाने द्वितीय क्रमांक पटकावला. तेगनूर सिंग पाबला व प्रब्लीन कौर पाबला यांनी लोकनृत्यात द्वितीय क्रमांक मिळवून विशेष प्रशंसा प्राप्त केली. विद्यार्थ्यांच्या या यशामागे संगीत शिक्षिका उषा अकाले, संगीत शिक्षक अस्मित अकाले, विशाल रामनगरिया, सौरभ सहारे तसेच नृत्य प्रशिक्षक तपस्या वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.