तभा वृत्तसेवा
आर्णी,
candidates-applications-submitted : आर्णी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होऊ घातली आहे. 10 ते 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. 16 नोव्हेंबरला 4 उमेदवारांनी 5 अर्ज नप अध्यक्ष पदासाठी भरले. कांग्रेसकडून नालंदा भरणे, रा. काँ. कडून अश्वजित गायकवाड, शिवसेना उबाठाकडून लक्ष्मण पठाडे तर निलेश मेश्राम अपक्ष असे 4 उमेदवारांनी 5 उमेदवारी अर्ज दाखल केले. 52 उमेदवारांनी नगरसेवकांसाठी 55 अर्ज निवडणूक निर्णय अधिकाèयांकडे सादर केले, अशी माहिती आर्णी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी वैशाख वाहुरवाघ तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राऊत यांनी दिली.