कुलधरियांचा राजिनामा कल्पनेच्या बाहेर

* भाजपा जिल्हाध्यक्ष गाते

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
sanjay-gate : भाजपाचे आधारस्तंभ, ज्यांनी पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी नाराजीतून राजिनामा देत आपल्या भावना व्यत केल्या असतील. परंतु, त्यांचा राजिनामा कल्पनेच्या बाहेर असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी दिली. कुलधरिया यांनी राजिनामा दिल्याच्या वृत्ताने दिवसभर वर्धेत खळबळ उडाली होती.
 
 
 
gate
 
 
 
वर्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीत जुन्या कार्यर्त्यांना स्थान मिळाले नाही. जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोणत्याही विचारात सहभागी करून घेतल्या जात नाही. ही भावना मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भाजपाचा राजिनामा दिला असल्याचे कमल कुलधरिया यांनी सांगितले. आपण १९८६ पासुन भाजपात काम करतो आहोत. नगरसेवक होतो, आर्वी विधानसभा मतदारसंघात दोनदा निवडणूक प्रचारक म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
या संदर्भात गाते यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि कुलधरिया यांचे अतुट नाते आहे. त्यांनी राजिनामा दिल्याने आपण त्यांनी उद्या सोमवारी प्रत्यक्ष भेटून त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे गाते यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.