स्वयंरोजगाराला प्राधान्य देण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करा

स्वदेशी संकल्प यात्रेत नागरिकांना आवाहन

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर,
self-employment-indigenous : भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराला प्राधान्य देण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करा,असे आवाहन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण भरतिया यांनी केले. स्वदेशी संकल्प यात्रेच्या दुसर्‍या दिवशी, राजू जैन यांच्या नेतृत्वात रथ यात्रा अजनी चौक मार्गे पुढे मार्गस्थ झाली. पांडे लेआउट, खामला बाजार रिंग रोड, त्रिमूर्ती नगर येथून नेत्रालय वासुदेव नगर येथे थांबली. हिंगणा व्यापारी संघाचे अध्यक्ष रवींद्र जैन यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला आणि व्यापार्‍यांनी रथाचे स्वागत केले. याप्रसंगी प्रभाकर देशमुख, योग अभ्यास मंडळाच्या सदस्या अर्चना रस्तोगी, राजू पाटील, महेश लोखंडे, अनिल सिंग आणि बालाजी नगरमधील अनेक नागरिक उपस्थित होते.
 
 

swadeshi-yatra-one 
 
 
 
स्वदेशी वस्तूचा स्विकार करा
 
 
आपल्या मार्गदर्शनात भरतिया पुढे म्हणाले, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्थानिक बाजारपेठ ताब्यात घेतल्या आहेत. यापासून मुक्त होण्यासाठी आता आपणास स्वदेशी वस्तूचा स्विकार करणे आवश्यक आहे.
 
 
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर देशमुख यांनी सांगितले की, बाजारात सोने, चांदी, पेट्रोल आणि डिझेलसह सर्व महाग झाले आहे. त्यामुळे आता स्वदेशी वस्तूंचा उपयोग करणे गरजेचे आहे. हिंगणा मार्गे ही संकल्प यात्रा रिलायन्स मार्टस, महिंद्रा अँड महिंद्रा गेट मार्गे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.