नवी मुंबई ते नागपूर विमानसेवा २५ डिसेंबरपासून

इंडिगो एअरलाइन्सकडून तिकीट बुकिंग सुरू

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
navi-mumbai-to-nagpur-flight : नवी मुंबई विमानतळावरून नागपूरसह १० शहरांसाठी इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणे येत्या २५ डिसेंबरपासून सुरू केली जात आहे. यामुळे नागपूरच्या प्रवाशांना नवीन कमी वेळात पोहोचता येईल. इंडिगो एअरलाइन्सच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंग सुरू झाली असून हे नवीन विमान नवी मुंबई विमानतळावरून दुपारी १.४५ वाजता निघेल आणि नागपूरला दुपारी ३.२० वाजता पोहोचेल. तर नागपूरहून दुपारी ४ वाजता निघेल आणि नवी मुंबईत ५.३५ वाजता पोहोचेल. इंडिगो एअरलाइन्सच्या माहितीनुसार भविष्यात नवी मुंबई येथून विमानांची संख्या जाणार आहे. इंडिगो व्यतिरिक्त, एअर इंडिया देखील नवी मुंबई विमानतळावरून विमान सेवा सुरू करणार आहे. मात्र एअर इंडियाने अद्याप तिकीट विक्री सुरू केलेली नाही.
 
 

indigo