नागपूर,
Nagpur News महिला प्रबोधन मंडळ आणि हनुमान मंदिर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी पेंटिंग व ग्रीटिंग कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. श्री. गुरु कौशिक यांनी मुलांना विविध टेक्निक्स व रंगसंगतीचे मार्गदर्शन दिले. एकूण २६ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मंचावर अभय चोरघडे, विजयाताई पाध्ये आणि उर्मिला राजदेरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन विभा गाडगीळ व परिचय तेजश्री काटदरे यांनी केला. उत्कृष्ट पेंटिंगसाठी अनुष्का काटदरेला प्रथम, ध्रुवी आकरेला द्वितीय आणि संस्कृती मूनला तृतीय क्रमांक देण्यात आला. Nagpur News सर्व मुलांना प्रमाणपत्र आणि खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमात काशीकर यांची विशेष उपस्थिती होती. मंडळाच्या सदस्यांचा आणि मंदिर समितीचा उत्तम सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र