बुलढाणा,
pragati-library : प्रगती वाचनालयाच्या वतीने वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. सखाराम कुल्ली यांच्या दि. १५ नोव्हेंबर हा जन्मदिवस त्यानिमित्ताने प्रगती वाचनालयात यावर्षी प्रकाशित झालेल्या विविध विषयावरील दर्जेदार व वांग्मयीन मूल्य असलेल्या दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले.या दिवाळी अंका प्रदर्शनाचे उदघाटन वाचनालयाचे सचिव प्रा.डॉ. कि.वा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. एस एम कानडजे होते.

यावेळी बुलढाणा शहरातील साहित्य व सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.एस एम कानडजे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर काणे बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाक दयानंद मिसाळकर डॉ. रवींद्र खर्चे साहित्यिक सुरेश साबळे त्यांनी प्रा. डॉ. कुल्ली यांच्या आठवणी सांगून बुलढाण्यातील चोखंदळवाचक रसिकांनी या दिवाळी अंकाचे वाचन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन वाचनालयाचे जेष्ठ सदस्य पुरुषोत्तम गणगे यांनी केले. या कार्यक्रमाला आदिवासी साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. गोविंद गायीकी प्रा. विनोद देशमुख, रविकिरण टाकळकर, पंजाबराव गायकवाड,प्रा.डी.एम कानडजे, डॉ.लता बाहेकर, मुकुंद पारवे, शाहीना पठाण, अनिता कापरे, प्रज्ञा लांजेवार, प्रतापराव सपकाळ, सरला इंगळे, गजानन अंभोरे इत्यादीसह बहूसंख्य संख्येने वाचक रसिक, श्रोते उपस्थित होते.