राळेगाव,
ralegaon-elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजायचा बाकी असला तरी ग्रामीण भागात वातावरण तापायला लागले आहे पक्ष निश्चित नाही उमेदवार ठरले नाही पॅनलची आखणीही सुरू नाही तरीपण प्रचार मात्र जोमात सुरू दिसून येत आहे. गावागावात सध्या मीच पुढचा सदस्य हळुवार मोहीम सुरू आहे कोणी हळूच अंगनात चहा घेत बसलेले तर कोणी रात्री सभा घेऊन गावाच्या विकासासाठी मी योग्य अशी वचने देत आहेत.
फरक एवढाच की पक्ष अजून ठरलेला नाही महाविकास आघाडी, महायुती या दोन्हींमध्ये स्थानिक पातळीवर युती होणार नाही हे निश्चित झले आहे. एका गटात पाच-सहा पक्ष मैदानात उतरणार म्हणजेच यंदा निवडणुकीत ‘थ्री कॉर्नर’ नव्हे तर ‘सिक्स कॉर्नर फाईट’ होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत निवडणुकीची शिट्टी वाजणे बाकी असून मैदानावर धाव सुरू झाली आहे. त्यामुळे होणाèया जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुणी कुणाचा नाही, हे चित्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार असे दिसते.