धक्कादायक... विवाहित पुरुषाने प्रियसीला जाळले जिवंत

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
दुमका, 
married-man-burns-girlfriend-alive झारखंडमधील दुमका जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पुरूषाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळले. आरोपीच्या पत्नीनेही या कृत्यात त्याला साथ दिली. पीडितेची ओळख विधवा म्हणून झाली आहे आणि ती तीन वर्षांपासून त्या तरुणाशी प्रेमसंबंधात होती. पोलिसांनी रविवारी सांगितले की, पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर त्याची पत्नी फरार आहे. पोलिस पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि त्याच्या पत्नीचा शोध घेत आहेत.
 
married-man-burns-girlfriend-alive
 
ही संपूर्ण घटना १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडल्याचे वृत्त आहे. दुमका जिल्ह्यातील शिकारीपारा पोलिस स्टेशन हद्दीतील सीतासल गावात पीडितेला जाळण्यात आले. पीडितेचे नाव माकू मुर्मू असे आहे. married-man-burns-girlfriend-alive शिकारीपारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अमित लाक्रा म्हणाले, "पीडित मुलीची आई फूलमणी हंसदा यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर पश्चिम बंगालमधील बर्दवान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत." स्टेशन प्रभारी म्हणाले की, माकू मुर्मूचे तीन वर्षांपासून मोंगला देहरी नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. पीडितेची आई फूलमणी हंसदा यांच्या तक्रारीचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, १३ नोव्हेंबर रोजी मोंगला देहरी आणि त्याची पत्नी सीतासल गावातील माकू मुर्मूच्या घरी गेले होते. तिथे त्यांच्यात आणि माकू मुर्मूमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर मोंगला देहरी आणि त्याच्या पत्नीने पीडितेच्या घरात साठवलेले पेट्रोल तिच्यावर ओतून तिला जाळून टाकले. त्यांनी सांगितले की, आरोपी मोंगला देहरीला शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे, तर त्याची पत्नी फरार आहे. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचा शोध देखील सुरू केला आहे.