सिंदी नपत उद्या भरणार उमेदवारांची जत्रा!

*कागदपत्र जुळवण्यात गेला आठवडा

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
sindhi-municipal-council : तब्बल नऊ वर्षानंतर होणार्‍या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होण्याचा उद्या १७ रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी पालिका कार्यालयात भावी लोकप्रतिनिधीची जणू जत्राच भरणार आहे.
 
 
 
election
 
 
 
दीर्घ प्रतीक्षेनंतर होणार्‍या या निवडणुकीच्या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता दीड डझन माजी नगरसेवक त्यांचे कुलदीपक, स्नुषा, लाडकी बहीण, अर्धांगिणी आपले नामांकन दाखल करतील. त्यात काही पाच ते सहा वेळा पराजय पचवणारे धुरंदर देखील बघायला मिळणार आहे. यंदा निवडणूक आयोगाने फार किचकट अटी ठेवल्यामुळे उमेदवारी अर्जात त्याची पूर्तता करताना अनेकांना घाम फुटला. परिणामी, १५ नोव्हेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज संबंधित अधिकार्‍यांना मिळाला नाही. रविवारी, इच्छुकांनी दिवसभर जोडजंतर करून अर्ज भरले. सोमवारी विहित मुदतीत तो सादर करून त्याची पोचपावती घेणार आहेत.
 
 
आज नगराध्यक्षपदासाठी किमान ७ उमेदवारी अर्ज येण्याची शयता आहे. १० प्रभागातील २० जागांकरिता सरासरी ८०-८५ नामांकन दाखल होतील, अशी शयता वर्तविली जात आहे. नगराध्यक्ष पद खुल्या गटातून परंतु महिलेसाठी राखीव असल्यामुळे ठराविक माजी नगराध्यक्ष महिला यावेळी उत्सुक नसल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. पण, शरद पवार गटाने एक महिन्यापूर्वीच जाहीर केलेल्या सुनीता कलोडे सोमवारी पुन्हा रिंगणात उतरतील, एवढे नकी!