शिव मंदिरात दिव्यांचा झगमगाट

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Shiva temple बेलिशॉप–मोतीबाग रेल्वे कॉलनी, कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिरात कार्तिक महिन्यानिमित्त आयोजित दीपोत्सवाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. संपूर्ण मंदिर परिसर ५००१ दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. ६० फूट उंच त्रिशुळाची नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक सजावट आणि भव्य रंगोलीने मंदिर परिसराला दिव्य रूप मिळाले. जिया श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्का मोरे, रक्षा मोरे, कोमल सिंग आणि पल्लवी सिंग यांनी ५० किलो रंगांनी सजवलेली २४x१६ फूट आकाराची रंगोली साकारण केली.

nagpur
दीपोत्सवाला डब्ल्यूसीएलचे संचालक (मानव संसाधन) हेमंत पांडे, डॉ. उदय बोधनकर, संयुक्त आयुक्त (आयकर) संजय अग्रवाल, नवनितसिंह तुली, डॉ. संजय मालवीय, आशीष तायल आदी मान्यवर उपस्थित होते. अतिथींनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि आयोजनाची प्रशंसा केली. दक्षिण भारतीय समाजामार्फत गेल्या १२ वर्षांपासून हा दीपोत्सव आयोजित केला जात असून यंदाही मोठ्या श्रद्धाभावात दीपदान पार पडले. Shiva temple कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश (गुंडू), पी. सत्याराव, जुगलकिशोर साहू, उमेश चोकसे, श्रीकांत रॉय आदींचे मोलाचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण डबली यांनी केले. हा दीपोत्सव भक्ती, सौंदर्य आणि सांस्कृतिक एकतेचा अविस्मरणीय संगम ठरला.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र