स्वदेशीची ही चळवळ राष्ट्रीय पुनर्जागरणाचा मार्ग

’स्वदेशी’च्या उत्पादनांबाबत जनजागृतीसाठी रथयात्रा

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
swadeshi-rath-yatra स्थानिक उत्पादनांच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठीच ’स्वदेशी’ रथयात्रा काढण्यात आली आहे. स्वदेशीची ही चळवळ केवळ आर्थिक आंदोलन नसून राष्ट्रीय पुनर्जागरणाचा मार्ग होय, असे स्पष्ट प्रतिपादन दिल्लीचे खासदार तसेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी केले.
 
swadeshi-rath-yatra
 
धंतोली येथील गोरक्षण सभेच्या प्रांगणात स्वदेशी स्वावलंबन संकल्प रथ यात्रेचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. swadeshi-rath-yatra यावेळी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण भरतिया, सारंग गडकरी, राजेश लोंदे, प्रसन्न पातुरकर, अजय पत्की, धनंजय भिडे, उमेश महतो, पुरुषोत्तम गौरव, अमिता पत्की, राजकुमार गुप्ता, विनोद किशोर धाराशिवकर, रामकृष्ण गुप्ता, ज्योती अवस्थि, संगीता खंडेलवाल, गोंविद पटेल, राजू जैन, अश्विन मेहाडीया, विपुल त्यागी, स्वदेशी जागरण मंचचे सतीश कप्तान खत्री आदींची उपस्थिती होती.
रथयात्रा देशभरात भ्रमण करणार
’स्वदेशी’ रथयात्रेची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते झेंडा दाखवून झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या या यात्रेचा पहिला टप्पा सुरू झाला. ही ’स्वदेशी’ रथयात्रा संपूर्ण देशभरात भ्रमण करीत प्रचार प्रसार करणार आहे. याद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत स्वदेशी उत्पादनांबाबत जागृती करण्याचा मुळ हेतू असल्याची माहिती बालकृष्ण भरतिया यांनी दिली.
स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार वाढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वदेशी, स्वावलंबन, भारत आणि ’व्होकल फॉर लोकल’चा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी स्वावलंबन संकल्प रथ यात्रा काढण्यात आली आहे. swadeshi-rath-yatra स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार वाढावा यासाठी सातत्याने प्रयत्न असल्याचे राजेश लोंदे यांनी सांगितले.
माइकवर स्वदेशी गीते व घोषणा
स्वदेशी स्वावलंबन यात्रा विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमधून जाणार आहे. पहिल्याच ही यात्रा चार ते पाच गावांशी संपर्क करीत पुढे मार्गस्थ झाली. रथासोबत असलेल्या एलईडी प्रोजेक्टरच्या सहाय्याने स्वदेशी उत्पादनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच माइकवर स्वदेशी गीते व घोषणा दिल्या जात आहे. याशिवाय, संकल्पपत्र आणि व्यापारी हितसंबंधी पत्रकांचे वितरण सुध्दा केल्या जात आहे. यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी स्थानिक स्तरावर स्वदेशी जागरण प्रतिनिधी आणि व्यापारी संघटना एकत्रितपणे व्यवस्था सांभाळत असल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय सहसंयोजक अजय पतकी, धनंजय भिडे यांनी दिली. ’स्वदेशी’ रथयात्रेच्या यशस्वितेसाठी स्वदेशी जागरण मंचचे सदस्य प्रवीण मसे, राजकुमार गुप्ता, विनोद गुप्ता, गोविंद पटेल, प्रभाकर देशमुख, रवींद्र जैन, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष फारूक अकबानी, कोषाध्यक्ष सचिन हुसैन अजानी आदी परिश्रम घेत आहे.