तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Umarkhed Municipal Council election नगरपरिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर नामांकन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याआधी 14 नोव्हेंबर रोजी माजी नगर परिषद अध्यक्ष भावना बालाजी उदावंत, निधी नितीन भुतडा, आघाडीतर्फे तेजश्री संतोष जैन यांनी नप अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून सहाजणांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी पक्ष कोणाला संधी देतो याकडे सामान्य नागरिकांसह राजकीय तज्ञांचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या वतीने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणाèयांमध्ये संगीता जितेंद्र पवार, शालिनी अरविंद भोयर व अर्चना कैलास उदावंत यांचाही समावेश आहे.
रविवार, 16 नोव्हेंबर दुपारी 2.30 वाजेपर्यंत, ऑनलाईन व ऑफलाईन मिळून एकूण 75 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये नप अध्यक्ष पदासाठी तब्बल 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.उमरखेड नगरपरिषद निवडणूक भाजपा,राष्ट्रवादी (एनसीपी) युतीच्या रूपात लढवली जात असून शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. दरम्यान, नगसेवक पदासाठी 25 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून उर्वरित अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत.निधी भुतडा यांच्या प्रवेशामुळे नप अध्यक्षपदाची लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.16 नोव्हेंबर रोजी नगर परिषद सदस्यपदासाठी 50 अर्ज प्राप्त झाले होते. तर नगर परिषद अध्यक्षपदासाठी 7 अर्ज प्राप्त झाले आहेत.