देशी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त

*एकास अटक : ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
desi-pistol-seized : मोठ्या गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस असा ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहरातील इतवारा पोलिस चौकी परिसरात १६ रोजी करण्यात आली. अमोल वंजारी (३१) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.
 
 
 
jkj
 
 
 
अमोल वंजारी हा शहरातील धंतोली येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात विविध गुन्हेही दाखल आहे. रविवार १६ रोजी तो इतवारा पोलिस चौकी परिसरात पोलिसांना आढळला. पोलिसांना बघताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता देशी पिस्टल व जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राहुल इटेकर, अमर लाखे, अमरदीप पाटील, चंद्रकांत बुरंगे, धर्मेंद्र अकाली, पवन पन्नासे, निरतेश कुर्‍हाडकर यांनी केली.