तभा वृत्तसेवा
उमरखेड,
fraud-on-the-pretext-of-job : नोकरी लावून देतो म्हणून वाशिम जिल्ह्यातील तीनजणांनी संगनमत करून किनवट तालुक्यातील 31 वर्षीय युवकाची 29 लाखांनी फसवणूक केल्याची घटना येथे घडली.
फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीवरून 15 नोव्हेंबर रोजी उमरखेड पोलिसांनी फसवणूक करणाèया तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. रमेश इंद्रजित पडवाल (वय 31, नागेशवाडी, ता. किनवट, जि. नांदेड) या युवकाला नोकरी लावून देतो, म्हणून आरोपी रमेश नवघरे (वय 48), सुरेश गजभार (वय 48) व सचिन शेजर (वय 45, आसरा, जि. वाशिम) यांनी 15 नोव्हेंबर रोजी रमेश नवघरे यांना उमरखेड येथील मते नगरातील ग्रीनपार्क कॉलनीमध्ये बोलावून घेतले. युवकाकडून 15 लाख रोख व बँकेतून 14 लाख असे 29 लाख रु. घेऊन या ठिकाणावरून पोबारा केला.
मात्र त्यांच्याकडून कोणताच निरोप न आल्याने आपण फसल्याचे रमेशच्या लक्षात येताच त्याने उमरखेड पोलिसात तक्रार दिली. ठाणेदार शंकर पांचाळ यांनी तीन पसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव करीत आहेत.