“माझं सत्य... माझं कुटुंब... शांत मनच महत्त्वाचं...

ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत मलायका अरोरा ठाम

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Malaika Arora फिटनेस, फॅशन आणि ग्लॅमर यामुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री मलायका अरोरा अलीकडेच 50 वर्षांची झाली. वाढदिवसानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, पण त्याचसोबत काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. अर्जुन कपूरसोबत झालेलं ब्रेकअप, अरबाज खानपासूनचा घटस्फोट, मुलगा अरहानचं संगोपन आणि तिच्या डान्स व्हिडिओजमुळे मलायकाला अनेकदा सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या ट्रोलिंगला थेट उत्तर दिलं आहे.
 

Malaika Arora 
 
 
मुलाखतीत मलायका म्हणाली, “मी माझ्या सत्यावर लक्ष केंद्रित करायला शिकले आहे. त्यामुळे नकारात्मकतेला माझ्यावर परिणाम करू देत नाही. ट्रोल्स तर नेहमी ट्रोल्सच राहणार, पण मी स्वतःला त्या विषारी वातावरणाचा भाग बनू देत नाही. माझ्यासाठी माझं कुटुंब, मित्र आणि शांत मन अधिक महत्त्वाचं आहे.” तिने सांगितले की ट्रोलिंगमुळे तिच्या आयुष्याच्या निर्णयांवर परिणाम होऊ देण्याचा ती कधी विचारही करत नाही.
मुलाखतीदरम्यान मलायकाने Malaika Arora तिच्या करिअरबद्दलही भाष्य केले. अभिनयापेक्षा डान्स परफॉर्मन्सने तिला अधिक आनंद आणि समाधान दिल्याचे ती म्हणाली. “अभिनय मला आवडायचा, पण डान्स माझं खरं प्रेम आहे. आयटम नंबर हा एक मर्यादित लेबल मानला जातो, पण आज अनेक कलाकार त्याकडे एक आव्हान म्हणून पाहतात. आता संकल्पना, परफॉर्मन्स आणि कथानकात गाण्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आधी हे फक्त व्हिज्युअल ट्रीट मानलं जायचं, पण या गाण्यांसाठी किती मेहनत घेतली जाते हे पाहून मला त्याचा अधिक आदर वाटू लागला,” असा भावनिक खुलासा मलायकाने केला.
‘छैय्या छैय्या’, ‘माही वे’, ‘होठ रसिले’, ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘अनारकली डिस्को चली’ यांसारख्या गाण्यांनी मलायकाला विशेष ओळख मिळवून दिली. आजही तिच्या स्क्रीनवरील एनर्जी आणि स्टाइल अनेकांना प्रेरणा देतात. वाढत्या वयासह तिच्या फिटनेसकडेही लक्ष वेधलं जातं आणि तिच्या जीवनाविषयीचा बेधडक दृष्टिकोन नेहमीच चर्चेत राहतो.
ट्रोलिंगला Malaika Arora न जुमानता स्वतःचा मार्ग निवडणारी मलायका आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानली जाते.