पोदार प्रेपमध्ये वार्षिक महोत्सव

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Podar Prep जगन्नाथ नगर येथील पोदार प्रेप शाळेत वार्षिक महोत्सव “जम्बो के सूर और साज का संगम” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारताच्या विविधतेवर प्रकाश टाकणाऱ्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांच्या पारंपरिक वाद्यांची ओळख करून देण्यात आली.
 
 
Podar Prep
 
कार्यक्रमात पंजाबच्या ढोल, गोव्याच्या घुमट, छत्तीसगडचा धांकुल, कर्नाटकची वीणा, बिहारची सारंगी, वेस्ट बंगालची एकतारा, मध्य प्रदेशचा नगारा, उत्तर प्रदेशाची शहनाई, तेलंगानाची किन्नरा, आंध्रप्रदेशाचा गोटू वाद्यम, तामिळनाडूचा मृदंगम, Podar Prep गुजरातचा ढोलक, दादरा आणि नगर हवेलीचा तारपा आणि महाराष्ट्राची तुतारी यांसारखी विविध पारंपरिक वाद्ये सादर केली गेली.
 
 
पोदार प्रेपमधील लहान मुलांनी नृत्याद्वारे ताल साधत रंगमंचावर सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाची संकल्पना मिस स्वाती पोपट वत्स यांनी तयार केली होती. Podar Prep सेंटर हेड मिस रश्मी कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
सौजन्य: सोनाली गलगाटे, संपर्क मित्र