गडचिरोली,
Armori Mayor candidate, आरमोरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीतर्फे एबी फॉर्मसह रुपेश प्रकाश पुणेकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.युवकांचे मित्र तसेच सर्वसामान्य जनतेच्या मनातील चेहरा व सर्वसामान्य जनतेला चालणारा एक स्वच्छ प्रतिमेचा उच्चशिक्षित उमेदवार म्हणून रुपेश प्रकाश पुणेकर यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष पदाकरिता आज शेकडोच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
तसेच प्रभाग क्रमांक 6 करिता रजनीश हिरालाल वालदे व उज्वला संजय बिडवाईकर (भोयर) यांची भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदाकरिता उमेदवारी जाहीर करण्यात आली.याप्रसंगी सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, नगराध्यक्षपदाचे सूचक म्हणून श्रीहरी कोपुलवार, आरमोरी नगर परिषदेचे प्रथम माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, माजी सभापती विलास पारधी व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.