आर्वीत अध्यक्षासाठी १२ तर सदस्यांसाठी ११८ नामांकन

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
आर्वी,
Arvi municipal elections राजकीय दृष्ट्या अतिशय गाेंंधळाचे गाव म्हणून आर्वीची नव्याने ओळख होत आहे. येथे काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसकडे एबी फॉर्मच आले नसल्याची आर्वीत चांगलीच चर्चा रंगली होती. आज सकाळपर्यंत भाजपाचा अधिकृत उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दोन दिवसात दोन नावं पुढे आले होते. सकाळी अधिकृत नाव पुढे आले. आज अध्यक्षपदासाठी १२ तर सदस्यांसाठी ११८ नामांकन दाखल झाले आहेत. आज अध्यक्षपदासाठी ८ तर सदस्यांसाठी ८६ नामनिर्देशन दाखल झाले.
 

Arvi municipal elections  
आर्वीत नगराध्यक्षपदाकारिता भाजपाच्या स्वाती गुल्हाने, काँग्रेसच्या अंजली जगताप, शिवसेनेकडून दीपाली देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभांगी कलोडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आर्वी नगरपालिकेमध्ये १२ प्रभाग असून २५ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्या २५ नगरसेवकांकरिता भाजपाकडून २५ उमेदवारांचे अर्ज, काँग्रेसकडून ४, शरदचंद्र पवार गटाकडून २१, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८, शिवसेनाचे १०, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ६ अर्ज दाखल करण्यात आले.