नवी दिल्ली,
delhi-blast-accused-aamir-rashid राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी स्फोटात अटक करण्यात आलेला आरोपी आमिर रशीद अलीला दिल्ली न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल आरोपीला अटक केली आणि आज १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते.