देवळी,
Deoli municipal elections देवळी नगरपरिषदेत नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी राजकीय लगबग पाहायला मिळाली. आजपर्यत अध्यक्षपदाकरिता तब्बल ८ उमेदवारांनी तर सदस्यपदाकरिता ७८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपाकडून माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांनी १६ रोजी शतिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून सुरेश वैद्य यांनी माजीमंत्री रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात रॅली काढत नामांकन सादर केले. युवा संघर्ष मोर्चा व जनशती आघाडीचे किरण ठाकरे यांनी शिवसेना व इतर आघाडीतील पदाधिकार्यांसोबत शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
दरम्यान, भाजपाचे डॉ. नरेंद्र मदनकर यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताच शहरात चर्चेला उधाण आलेे. त्यांच्यासह इतर चार अपक्ष उमेदवारांनीही अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले असून या पदासाठी बहुपक्षीय चुरस निर्माण झाली आहे.सदस्य पदाकरिता भाजप, काँग्रेस, जनशक्ती आघाडी व अपक्ष असे ७८ अर्ज दाखल झाले. अखेरच्या दिवशी उमेदवारांनी ढोल-ताशे, आणि मोठयाप्रमाणात समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढत दमदार शती प्रदर्शन केले.
नामांकन प्रक्रिया Deoli municipal elections पूर्ण झाल्यानंतर आता शहरात अर्ज तपासणी, अर्ज कायम किती राहणार आणि कोण उमेदवार अर्ज मागे घेतो याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी जनसंपर्क गतीमान केला असून गाठीभेटी, कॉर्नर मीटिंग, प्रचाराचे रणनीतीकरण सुरू झाले आहे. यंदाची देवळी नगरपरिषद निवडणूक चौकोनी लढतीमुळे अधिक चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे. अध्यक्ष व सदस्य पदाकरिता प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात राहते हे पाहणे औसुयाचे राहणार आहे.