हिंगणघाट,
Hinganghat municipal elections नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपाकडून प्रा. डॉ. नयना तुळसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. नगराध्यक्षपद हे यंदाच्या निवडणुकीत सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने विविध पक्षांकडूनही स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. उबाठाकडून माजी नगरसेवक नीता धोबे, शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक शुभांगी डोंगरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून योगिता घुसे या प्रमुख उमेदवारांसह ३ नगराध्यक्षपदाकरिता आपले हिंगणघाट नगरपरिषदेसाठी आज अध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यांसाठी १४२ नामनिर्देशन दाखल झाले. आतापर्यंत अध्यक्षपदाकरिता १३ तर सदस्य पदाकरिता २४८ नामांकन दाखल झाले आहेत.
भाजपाच्या नयना तुळसकर यांच्या नामांकनाच्या वेळी आ. समीर कुणावार उपस्थित होते.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा असलेल्या नयना तुळसकर यांना विजयी करण्याचे आवाहन आ. कुणावार यांनी यावेळी केले आहे. भाजपच्या माजी नगरसेवक व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम बसंतानी यांच्या पत्नी जया, माजी नगरसेवक छाया सातपुते, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे नेते बिस्मिल्ला खान यांची कन्या रीना परवीन यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.