नवी दिल्ली,
Jadeja go to Rajasthan माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचे चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) सोडून राजस्थान रॉयल्स (आरआर) मध्ये सामील होण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार असून, यात संजू सॅमसन चेन्नईकडे गेला, तर जडेजा आणि सॅम करन राजस्थानमध्ये सामील झाले.
विशेष म्हणजे संजू सॅमसन मागील वर्षी १८ कोटी रुपयांमध्ये सीएसकेत सामील झाला होता, तर जडेजा त्याच्या मागील शुल्कापेक्षा १४ कोटी रुपयांमध्ये राजस्थानमध्ये गेला. आकाश चोप्राने यूट्यूबवर बोलताना जडेजाने मानधन कपात का स्वीकारले यावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, राजस्थानने जडेजा मिळवला, पण त्याची फी कमी केली. खेळाडूची किंमत त्याच्या संमतीशिवाय बदलता येत नाही. कोणताही खेळाडू स्वेच्छेने आपले मानधन कमी का करतो, विशेषतः माजी संघासाठी इतका मोठा सामना जिंकणाऱ्या खेळाड्यासाठी, हे आश्चर्यकारक आहे.
चोप्राच्या मते, जडेजाने चेन्नई सोडण्यासाठी ४ कोटी रुपयांची कपात केली, जी सर्वांसाठी आश्चर्याची बाब आहे. त्यांनी असेही सुचवले की, कदाचित जडेजा चेन्नईच्या वातावरणाला कंटाळला असेल आणि तिथे राहू इच्छित नसल्यामुळे तो राजस्थानमध्ये गेला. याशिवाय, आकाश चोप्राने उपस्थित केलेला मोठा प्रश्न असा आहे की, राजस्थानच्या कर्णधारपदामुळे जडेजा प्रभावित झाला होता का आणि हेच त्याला राजस्थानमध्ये जाण्यास प्रोत्साहित केले का, हे समजून घेणे मनोरंजक ठरेल. तथापि, या निर्णयामागे इतरही कारणे असू शकतात, ज्याची आतापर्यंत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.