पहलगाम, गुलमर्गसह विविध ठिकाणी तापमान शून्यखाली

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
जम्मू,
Jammu temperature below zero जम्मू-काश्मीरमध्ये हाडं गोठविणारी थंडी पडली असून श्रीनगर आणि शोपियानसह अनेक भागात तापमान गोठणबिंदूच्या खाली गेला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, श्रीनगरमध्ये सोमवारी पहाटे हंगामातील सर्वात थंड सकाळ नोंदवली गेली आणि पारा उणे १.८ अंश सेल्सिअस झाला. ही घसरण काश्मीर खोऱ्यात हिवाळ्यातील थंडीत आणखी तीव्रता येण्याचे संकेत देते.
 
Jammu temperature below zero
 
 
लोकांनी थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळ पहलगाममध्ये -३.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. दक्षिण काश्मीरच्या प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंडमध्ये -१.५ अंश सेल्सिअस तर उत्तर काश्मीरमधील कुपवाडामध्ये -१.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. गुलमर्ग स्की रिसॉर्टमध्ये किमान तापमान २.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, तिथे बर्फवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. शोपियान हा काश्मीरमधील सर्वात थंड जिल्हा ठरला असून, येथे तापमान -४.० अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे, तर उंच भागात हलकी बर्फवृष्टी सुरू झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्वतांमध्ये थंडी वाढल्याने मैदानी भागातही थंडीचे परिणाम जाणवतील. १८-१९ नोव्हेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेशाच्या काही भागात मध्यम ते तीव्र थंडीच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, १८-२० नोव्हेंबर रोजी पूर्व राजस्थान आणि पूर्व मध्य प्रदेश, तसेच १८-१९ नोव्हेंबर रोजी छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये थंडीच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे.