नितीश कुमार काही वेळात राजीनामा देतील!

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
पाटणा,
Nitish Kumar will resign बिहार निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवीन सरकार स्थापनेस गती आलेली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची अंतिम बैठकपार पडली असून बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना राजीनामा सादर करतील आणि नवीन सरकार स्थापनेस दावा करतील. २० नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर शपथविधी सोहळा आयोजित केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
 
 

nittish kumar 
एनडीए घटक पक्ष – भाजपा, जेडीयू, एलजेपी(आर), एचएएम आणि आरएलएमओ – यांनी जवळजवळ सहमती दर्शवणारा मंत्रिमंडळ फॉर्म्युला ठरवला आहे. यानुसार भाजप आणि जेडीयूला अंदाजे समान मंत्रिपदे मिळतील, तर एलजेपी(आर) कडून दोन, आणि एचएएम व आरएलएमओ कडून प्रत्येकी एक मंत्री असतील. बिहारमध्ये मुख्यमंत्री समवेत एकूण ३६ मंत्र्यांची नियुक्ती अपेक्षित आहे.
सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत दिल्ली आणि पटनामध्ये तीव्र राजकीय हालचाली सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली, जिथे बिहार सरकारची रचना, मंत्रिमंडळाचे विभाजन आणि प्रमुख नेत्यांवर चर्चा झाली. पाटण्यात जेडीयू आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक सुरू होती, तर एलजेपी(आर), एचएएम आणि आरएलएमओच्या नेत्यांसोबतही सतत चर्चा चालू होती. सर्व एनडीए पक्ष आज विधिमंडळ पक्ष नेत्यांची निवड करतील, त्यानंतर युतीच्या संयुक्त बैठकीत विधिमंडळ पक्ष नेत्याची औपचारिक निवड करण्यात येईल.