मुंबई,
Obscene behavior with female students मुंबईतील विलेपार्ले येथील नामांकित शाळेत तीन शाळकरी मुलींसोबत विनयभंगाचा प्रकार उघडकीस आला आहे. प्राप्त माहितीनुसार, स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले. मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला आणि त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. जुहू पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी चालकाला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.
संग्रहित फोटो
सध्या पोलिस हा प्रकरण अधिक तपासत आहेत, ज्यामध्ये आरोपीने आणखी कोणत्या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केले आहे की नाही आणि त्याच्यावर पूर्वी कोणते गुन्हे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. माहितीनुसार, आरोपीने मुलींना व्हॅनमध्ये बसवताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना विलेपार्ले येथे घडल्यामुळे पालकांसह परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला न्यायालयाच्या आदेशानुसार कोठडी दिली आहे, आणि पुढील तपास सुरू आहे.