पुलगाव, १७ नोव्हेंबर
Pulgaon municipal elections गरपरिषद सार्वत्रिक निवडणुसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता बडगे यांनी तर नगरसेवक पदाच्या २१ उमेदवारांनी आज उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज अध्यक्षपदासाठी १२ तर सदस्यांसाठी १६० नामनिर्देशन दाखल झाले. आतापर्यंत अध्यक्षासाठी १७ तर सदस्यांसाठी २१८ अर्ज दाखल झाले आहेत.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती पुलगावकरांसाठी विश्वासाचे आणि सक्षम नेतृत्वाचे प्रतीक ठरली. ही टीम केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर पुलगावच्या घराघरात विकास नेण्यासाठी उभी आहे. पुलगावच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या प्रगतीसाठी हा अर्ज नव्या सुरुवातीची मुहूर्तमेढ असल्याचे आ. राजेश बकाने म्हणाले. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी कविता ब्राह्मणकार, शिवसेनेकडून स्वाती कुचे, मी पुलगावकर आघाडीकडून रंजिता साहू, बसपाकडून प्रतिभा वाघमारे आणि वंचित बहुजन आघाडीकडून संगीता रामटेके यांनी नामांकने दाखल केली. अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करण्याची झालेली चढाओढ पाहता निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचार्यांना आज मोठी धावपळ करावी लागली.