राज ठाकरेंना स्मृतीभंश झाला...'त्या' पोस्टवर भाजपाची टीका

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Raj Thackeray's memory loss शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांकडून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बाळासाहेबांच्या विचारांबाबत व्यक्त केलेल्या मतांमुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे. 
 

raj thakre and ban 
राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बाळासाहेबांचा फोटो शेअर करत लिहिले की, शिवसेना संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज आहे. बाळासाहेबांनी भाषिक अस्मितेच्या जोरावर प्रचंड चळवळ निर्माण केली आणि त्यातून एक राजकीय पक्षाची उभारणी केली. त्यांनी जातीय अस्मितेला हिंदुत्वाच्या आडवी उभी ठेवण्याऐवजी धर्माप्रती प्रेम ठेवले. बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. राज ठाकरेंनी पुढे म्हटले की, "बाळासाहेब हिंदुप्रेमी होते, पण त्यांच्यात चिकित्सक वृत्तीही होती. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा मतं मागणाऱ्यांची मजा वाटते. त्यांना बाळासाहेब आणि प्रबोधनकारांची वास्तविक समज नाही. फक्त मतं मिळवणे आणि सत्ता मिळाल्यावर तिला वापरणे हेच राजकारण ठरते, परंतु समाजकारण आधी आणि नंतर राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!
 
 
 
राज ठाकरे यांच्या पोस्टवर भाजपानेही प्रतिक्रिया दिली. भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, "बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतांचे राजकारण केले नाही. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका साकारली आणि त्यामुळे त्यांचा मतांचा टक्का वाढला. राज ठाकरेंना स्मृतीभंश झाला आहे. बाळासाहेब हे पहिल्यांदा हिंदू म्हणून मत देण्यावर भर देणारे होते. औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंसोबत गेले, त्यामुळे राज ठाकरे आपली भूमिका बदलत आहेत," असं बन यांनी स्पष्ट केले.