नागपूर,
Saraswati Vidyalaya सरस्वती विद्यालय, शंकर नगर येथे आयोजित ३७ वी स्मृती पद्मा बर्धन विज्ञान संभाषण स्पर्धा इयत्ता १० वी आणि ८ वी स्मृती श्री ए. सुदर्शन मेमोरियल विज्ञान संभाषण स्पर्धा इयत्ता ९ वी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सरस्वती विद्यालयाची शार्विका गजभिए १० वी गट आणि प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल, वाडीची अदिती दहाके (९ वी गट) यांनी विजेतेपद पटकावले. दक्षिण भारतीय शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष टी. के. वेंकटेश यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यंदा २६ राज्य शैक्षणिक मंडळातील शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

१० वीच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सीमा उबाले (प्रमुख, राजेंद्र सिंह सायन्स एक्सप्लोरॅटरी) आणि डॉ. रोहित पाटणे (सहाय्यक प्राध्यापक, जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) यांनी तर ९ वीच्या स्पर्धेचे परीक्षण डॉ. राम दफ्तरी (निवृत्त प्राध्यापक, धर्मपीठ विज्ञान महाविद्यालय) आणि डॉ. देवश्री नगरकर (प्राध्यापक, एल.ए.डी. महाविद्यालय) यांनी केले. Saraswati Vidyalaya कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन, उपमुख्याध्यापिका शैली अय्यर, पर्यवेक्षक रवींद्र कुलकर्णी, राहुल घोडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन सहयोजक श्रेयस पिंगले आणि मनुजा पिल्लाई यांनी केले.
सौजन्य: अनघा पेंडके, संपर्क मित्र