राष्ट्रभावनेचे स्मरण आपल्या कार्यात कायम असू द्या

वार्षिक क्रीडा महोत्सवात शांताक्का यांचे प्रतिपादन

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर,
Chandrapur school events विद्यार्थ्यांनी कोणतेही कार्य करताना ते समरस वृत्तीने, परिपूर्णतेचा आग्रह करीत करावे. राष्ट्रभावनेचे स्मरण आपल्या कार्यात कायम असू द्यावे. प्रामाणिकपणा हा जीवनाचा स्थायीभाव असावा. स्वतःचे भविष्य निर्माण करतानाच चारित्र्य निर्मितीही करावी, मानवता भाव अंगिकारावा, असा संदेश राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी विद्यार्थ्यांना दिला.येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या सार्धशती जयंतीचे औचित्य साधत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शांताक्का यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 

Chandrapur school events 
समोराहाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे सहसचिव नितीन कुमरवार होते. तर विद्यालयाच्या प्राचार्य अरुंधती कावडकर, सन्मित्र मंडळाचे सहसचिव सुधीर मसादे, कार्यकारिणी सदस्य विपीन देशपांडे, माणिक कद्रे, अश्विनी दाणी प्रभृती यावेळी मंचावर उपस्थित होते.कावडकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राष्ट्रसेविका समितीचे कार्य विशद करीत शांताक्का यांच्या व्यक्तित्वाचा व कार्याचा समग्र परिचय करून दिला. विद्यालयात राबवलेल्या वन्दे मातरम् सार्धशती उपक्रम, जनजाती गौरव पंधरवाड्याच्या निमित्ताने शाळेत आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्राचे क्रमशः वाचन व अन्य उपक्रमांचा आढावा घेत, क्रीडा महोत्सव आयोजनामागील भूमिकाही मांडली.
प्रमुख अतिथींच्या हस्ते याप्रसंगी क्रीडा स्पर्धांसाठी मैदानाचेही पूजन करण्यात आले. जनजाती गौरव पंधरवाड्याच्या निमित्ताने विद्यालयात एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन शांताक्का यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे व अनेक अज्ञात नायकांची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती.
महोत्सवाची सुरुवात शांताक्का यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. राष्ट्रगीत आणि राज्यगीतानंतर विद्यालयातील सर्व छात्रसैनिकांनी प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. संचालन गौरी तेलंग यांनी केले. समारोहाची सांगता सामूहिक वंदे मातरम् गायनाने झाली.