बालवाडी ते उच्च शिक्षण सर्वांना मोफत समान व गुणवत्तापुर्व मिळाले पाहीजे : प्रा. डॉ. शरद जावडेकर

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
Sharad Jawadekar भारत सरकार शिक्षणावरील खर्चात दरवर्षी कपात करीत आहे त्यामुळे गरीबांना शिक्षणापासुन वंचित होण्याची मिती आहे. शिक्षणव्यवस्था उध्वस्त करीत भारत महासत्ता होउ शकत नाही बालवाडीपासून उत्थशिक्षणापर्यंत संपुर्ण मोफत समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना मिळाले पाहीजे. त्यासाठी समाजवादी शिक्षण हक्क सभा लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी केले
 

Sharad Jawadekar 
जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथे दि. १४ नोव्हेंबर समाजादी शिक्षण हक्क सभा पुणे शाखा बुलढाण्याच्या वतीने आयोजीत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती तथा राष्ट्रीय शिक्षण दिन कार्यक्रमात ते बोलीत होते. अ‍ॅड. बाबासाहेब भोंडे आजीव सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात Sharad Jawadekar भारतरत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद पंडीत जवाहरलाल नेहरु व शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली अ.भा. समाजवादी शिक्षण हक्क समेच्या शिक्षण हक्क पत्रिका नासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मा.प्रा. डॉ. सुरेश गवई, प्राचार्य जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा, माडेंड जयसिंग देशमुख, विविज्ञ बुलढाणा, रमेश इंगळे उत्रादकर कवी, कादंबरीकार सुरेश साबळे साहित्यिक प्रा. डॉ संतोष आंबेकर, प्रा. डॉ. कि.वा. वाघ सचिव प्रगती वाचनालय बुलढाणा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. शिक्षणातील प्रश्न शिक्षण कर्ज योजना, डिजीटल शिक्षण, दुर शिक्षण क्रेडीट सिस्टीम इत्यादी थातुरमातुर उपायांनी सुटणारे नाहीत. त्यासाठी मार्सवादी दृष्टीकोन फुले शाहु, आआंबेडकरवादी दृष्टीकोन, गांधी तत्वज्ञान यांचा एकत्रीत विचार केला तरच व्यवस्था परीवर्तन होऊ शकेल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरद जावडेकर यांनी केले कार्यकमाचे उत्कृष्ट संबलन प्रा डॉ सुबोध चिंचोले यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संतोष आबेकर यांनी केले केओ बावस्कर गरुजी यांच्या महात्मा फुले, सावित्रीचाई फुले यांच्यावरील पोवाड्याने कार्यकन संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंजाबराव गायकवाड, प्रा. जे.जे. जावद शाहीना पठाण डॉ. विजया काकडे यांनी परीश्रम घेतले.