नगरपरिषद पदासाठी शिवसेना (शिंदे गट) पूजाताई संजय गायकवाड यांचा अर्ज दाखल

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
Pooja Sanjay Gaikwad नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शिवसेना (शिंदे गट) आ. संजय गायकवाड यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुजाताई यांनी उमेदवारी अर्ज दि. १७ नोव्हेंबर रोजी दाखल केला.
 
 
Pooja Sanjay Gaikwad
 
दुसर्‍यांदा नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. बुलढाणा नपा निवडणूक कक्षात उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसिलदार विठ्ठल कुमरे, मुख्याधिकारी श्रीमती काटकर यांच्याकडे अर्ज सादर केला. याप्रसंगी आ. संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, विजय अंभोरे, श्रीकृष्ण शिंदे, व शेकडो समर्थक नपा कार्यालयात उपस्थित होते.