शुभमन गिलचा चिंतेत टाकणारा व्हिडीओ...दिसली वाईट अवस्था

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Shubman Gill's video भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन येथे रंगला. तिसऱ्या दिवशी आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे पहिल्याच डावात रिटायर्ड हर्ट झाला. मान दुखल्यानं त्याला तातडीने कोलकात्यातील वुडलंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि रविवारी संध्याकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
 
 

Shubman Gill 
डिस्चार्जनंतरचा शुभमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याच्या मानेला लावलेला पट्टा आणि हाताला सलाईनचा बँडेज दिसत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. हॉस्पिटलमध्ये असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली.
 
 
 
गिलची प्रकृती बरी होत असली तरी तो 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फक्त तीन चेंडूंचा सामना करत त्याने एक चौकार लगावला, पण पुढच्याच क्षणी तीव्र वेदना झाल्यानं त्याने खेळ थांबवला आणि मैदान सोडावं लागलं. त्यामुळे संपूर्ण पहिला सामना त्याच्याकडून हुकला. टीम इंडियाचा कर्णधार अशा अवस्थेत दिसल्याने चाहत्यांमध्ये चिंता वाढली असून आता त्याच्या फिटनेस अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.